तुळजापूर:-आदिशक्ती जगत जननी कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पावन नगरीत तुळजापूर शहरात श्री. काळभैरवनाथ जयंतीनिमित्त येथील श्री काळभैरवनाथ मंदिर संस्थान, भिंडोळी उत्सव समिती व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.23 रोजी रांगोळी रेखाटन, दिपप्रज्वलन, सामुहिक महाआरतीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने दुपारी 12:30 ते 5 वाजेपर्यंत काळभैरव अष्टक भैरवचंडी आणि बटुकभैरव स्त्रोत्र यज्ञ विधी या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर सायंकाळी 5 वाजता रांगोळी रेखाटन, दिपप्रज्वलन,सामुहिक महाआरती संपन्न होणार असल्याची माहिती काळभैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच या कार्यक्रमासाठी श्री काळभैरवनाथ मंदीरात 5000 पणत्या लावण्याचा संकल्प असून यासाठी भाविकांनी सहकुटुंब येताना किमान 11 पणत्या व सोबत दुर्गा सप्तशती ग्रंथ घेऊन सहकुटुंब येण्याचे आवाहन काळभैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
काळभैरवनाथ उत्सवा संदर्भात अधिक माहितीसाठी उत्सव समितीतील लिंबाजी पुजारी मो.नं.9657510511, वैजिनाथ पुजारी मो.नं.9923742483, प्रकाशनाथ पुजारी मो.नं.9922876165,आदिनाथ पुजारी मो.नं.9172399612, प्रेमनाथ पुजारी मो.नं. 9921566690, कृष्णनाथ पुजारी मो.नं. 9860660342, व सोमनाथ पुजारी मो.नं.9665192001 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
0 Comments