धाराशिव:- येथील रुक्मिणी फाऊंडेशन चे सचिव प्रा.अभिमान हंगरगेकर यांचे जावई डाॅ.दत्तात्रय संपतराव निकम(साकुर्डी कराड)यांची नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय
अधिकारी वर्ग एक या पदावर नुकतीच निवड झाली आहे.
या निवडीबद्दल डाॅ.दत्तात्रय निकम यांचा शुक्रवार दि.8 रोजी हाॅटेल किंग्ज गार्डन धाराशिव येथे दुपारी 2 वाजता मान्यवरांचे उपस्थितीत शाल,बुके,सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी आ.बच्चु कडू,सहायक अभियंता यशपाल हंगरगेकर,ॲड. पवनकुमार भिसे,प्राचार्य डाॅ रमेश दापके-देशमुख,सौ.श्वेता निकम,प्राचार्य जी के सोन्नेपाटील,अशोक चव्हाण,शिक्षणाधिकारी शिवाजीराव जाधव,गोरोबा लोंढे,विजयकुमार बागल,प्रा.काकासाहेब आहेर,बापूसाहेब देशमुख, दिलीप पवार, प्रा.डाॅ.देविदास इंगळे,प्रा.सी एस पाटील,प्रा.रावसाहेब देशमुख,प्रा.विलासराव जगदाळे,प्रा.राजेंद्र घाडगे,प्रा.ए बी कदम,दादासाहेब हंगरकर,दिनकर हुग्गे,प्रा.डाॅ.छाया दापके-देशमुख, अनिल हंगरकर,महेश देशमुख,लक्ष्मीकांत दंडवते, विपुल पाटील,अरुण शितोळे,संपतराव निकम, सौ.आशा यादव,उषा पवार,अनिता पाटील यांचेसह रुक्मिणी फाऊंडेशन व तुळजाभवानी जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments