Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

भाजपला मोठा धक्का! भाजपचे पंचायत समिती उपसभापती दत्तात्रय शिंदेसह अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

काटी/उमाजी  गायकवाड 
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने भाजपला धक्का दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपचे  तुळजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय शिंदे यांच्यासह सांगवी (काटी) चे उपसरपंच मिलिंद मगर, सुरतगावचे माजी उपसरपंच राम गुंड,नामदेव सुरवसे,अजित अवताडे ,भागवत बनकर,प्रशांत पाटील आदींनी कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार ॲड. कुलदीप उर्फ धिरज पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख,खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला. 

यावेळी मा.आ.अमित देशमुख यांनी यापुढील कार्यकाळात सर्वांचा पक्षात सन्मान करण्यात येईल असे आश्वासन देत होवू  घातलेल्या विधानसभेत कॉंग्रेसचे उमेदवार कुलदीप उर्फ धिरज पाटील यांना पाठविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, कॉंग्रेसचे उमेदवार ॲड. धिरज पाटील यांच्या उपस्थितीत माजी उपसभापती दत्तात्रय शिंदे यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

भाजपचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे दत्तात्रय शिंदे हे निकटवर्तीय समजले जात होते. त्यांना तामलवाडी पंचायत समिती गणात मानणारा मोठा वर्ग असून त्यांनी या तामलवाडी पंचायत गणात विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविले असून त्यांच्या माध्यमातून विविध विकासकामे केली आहेत.भाजपच्या मराठा विरोधी अजेंड्याला कंटाळून तसेच पंचायतराज निवडणूका न घेतल्याने,स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी रोड मध्ये, रेल्वे व एमआयडीसी मध्ये गेल्या परंतु त्या बाधित शेतकऱ्यांना योग्य मावेजा दिला गेला नाही.अशा एक ना अनेक समस्या भाजपकडून मार्गी लागल्या नसल्याचा आरोप करीत आपण कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे माजी उपसभापती शिंदे यांनी सांगून कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार ॲड.कुलदीप उर्फ धिरज पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. दत्तात्रय शिंदे यांच्या कॉंग्रेस पक्षातील प्रवेशानंतर माजी मंत्री अमित देशमुख, खासदार ओमराजे निंबाळकर,कॉंग्रेसचे उमेदवार धिरज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

Post a Comment

0 Comments