काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटीचे सुपुत्र दलित मित्र नंदू बनसोडे यांचा मुंबई महानगरपालिकेतील सेवानिवृत्ती निमित्त येथील भीम नगर मध्ये बौद्ध समाज व ग्रामस्थांच्या वतीने शनिवार दि. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ,स्मृतीचिन्ह,सन्मानपत्र व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. दलित मित्र नंदू बनसोडे यांनी मुंबई महानगरपालिकेत सदर 35 वर्षे सेवा केली होती. मुंबई महानगरपालिकेत सेवा बजावत असताना त्यांनी आपल्या गावाशी असलेला प्रेमाचा ओलावा टिकवून ठेवला आहे. या सत्कार सोहळ्यासाठी शेषप्पा बनसोडे यांनी पुढाकार घेतला होता.
यावेळी कुमार ढेपे, शेषप्पा बनसोडे,अशोक बनसोडे, भोलेनाथ बनसोडे, जितेंद्र बनसोडे, दत्ता बनसोडे, आबा साबळे,बाळू बनसोडे आदीसह मित्रपरिवार ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments