'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी काट (ता. तुळजापूर) येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अपात्र लाभार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासह नवीन नोंदणी आणि वारसदार शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करण्यावर भर देण्यात आला.
शासनाच्या निर्देशानुसार, १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी जमीन नावावर असलेल्या शेतकऱ्यांसाठी तसेच जमीनमालकाच्या निधनानंतर त्यांच्या वारसांना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी हे विशेष शिबिर राबवण्यात आले. शिबिरादरम्यान कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि आवश्यक कागदपत्रे कशा प्रकारे पूर्ण करावीत, याची सविस्तर माहिती दिली. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या शंकांचे निरसन करून नवीन नोंदणीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे सादर केली.
मान्यवरांची उपस्थिती:
या शिबिरास पिएम किसान संगणक अधिकारी जयसिंग कदम, कृषी साहाय्यक सुमित कापसे, कमलाकर दराडे, कैलास पवार, उप कृषी अधिकारी संतोष गायकवाड, युवा प्रशिक्षणार्थी सुर्याजी चिवरे, सुहास घोडके, सतिश देशमुख, सरपंच सुजित हंगरकर, अशोक जाधव, ग्रामसेवक सुरवसे एल. के., आणि ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे अनेक गरजू शेतकऱ्यांना योजनेच्या कक्षेत येणे सोपे होणार असून, योजनेतील तांत्रिक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे, असा विश्वास उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
0 Comments