Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तिर्थ बु. येथे नव्या आरोग्य उपकेंद्राचा मार्ग मोकळा!जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना; ग्रामस्थांच्या मागणीला मिळणार बळ

तुळजापूर | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
तुळजापूर तालुक्यातील मौजे तिर्थ बु. येथे नवीन आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबत जिल्हा आरोग्य विभागाने तुळजापूर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र पाठवून आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मौजे तिर्थ बु. येथे नवीन आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्याबाबत ग्रामस्थांनी मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून तुळजापूर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे. सदर पत्रात गावातील लोकसंख्या व अंतराचा विचार करून आवश्यक प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, प्रस्तावासोबत ग्रामपंचायतीचे हमीपत्र, ७/१२ उतारा, गावाचा नकाशा, लोकसंख्येचा तपशील तसेच संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच आरोग्य सेवा संचालनालयाच्या दिनांक १२ जानेवारी २०१६ च्या विहित नमुन्यातील माहिती आणि वरिष्ठ कार्यालयाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हा आरोग्य विभागाने परिपूर्ण प्रस्ताव तीन प्रतींमध्ये कार्यालयास सादर करावा, असे स्पष्ट केले आहे. त्यानंतर तिर्थ बु. येथे नवीन आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची कार्यवाही करता येणार आहे.

दरम्यान, गावात आरोग्य उपकेंद्र उभारल्यास परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाच्या या पत्रामुळे तिर्थ बु. ग्रामस्थांच्या अनेक दिवसांच्या मागणीला आता प्रशासकीय पातळीवर सकारात्मक दिशा मिळाल्याचे चित्र आहे.

                          — Only न्यूज धाराशिव

Post a Comment

0 Comments