धाराशिव | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
शहरातील गरीब व होतकरू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत व्हावी, या उद्देशाने धाराशिव जिल्हा मित्र मंडळ समितीच्या वतीने मोफत वह्या वाटप कार्यक्रम रविवारी (दि. ९) उत्साहात पार पडला. सलग दुसऱ्या वर्षी राबविण्यात आलेल्या या उपक्रमात २५०० वह्यांचे वाटप करण्यात आले.
स्वयंबर मंगल कार्यालय, जिजाऊ चौक, बार्शी नाका येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वासअप्पा शिंदे होते. वह्यांचे वाटप नितीन काळे (भाजप मराठवाडा संयोजक), उमेशराजे निंबाळकर (काँग्रेस जिल्हाध्यक्ष), चंद्रसेन (बाबा) देशमुख, विभीषण (आण्णा) खामकर, ह.भ.प. भारत महाराज कोकाटे व तानाजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रशांत पाटील, राजू तांबे, प्रदीप तांबे, अशोक गायकवाड सर, विभीषण मोरे, महादेव तांबे, भास्कर जाधव, विजय बप्पा पवार, उमाकांत तपसाळे, पृथ्वीराज दंडनाईक, रमेश पवार यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. यापुढेही गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक सहकार्य करून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा मानस असल्याचे संयोजक तानाजी जाधव यांनी सांगितले.
0 Comments