Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

‘एकलव्य’च्या अंगणात माणुसकीचा झरा; वाढदिवसाचे अवडंबर टाळून महादेव पवार यांच्याकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप! तुळजापूर तालुक्यात अनोख्या उपक्रमाचे कौतुक; सलग चौथ्या वर्षी मंगरूळ आश्रमशाळेत सामाजिक बांधीलकीचा जागर

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | ' उमाजी गायकवाड 
शिवसेनेचे जिल्हा संघटक तथा सोशल मीडिया प्रमुख महादेव (दादा) पवार यांनी आपल्या वाढदिवसाचे कोणतेही अवाजवी अवडंबर न माजवता, सामाजिक बांधीलकीचे भान जपत मंगरूळ (यमगरवाडी) येथील ‘एकलव्य निवासी आश्रमशाळेत’ विद्यार्थ्यांसोबत आपला वाढदिवस अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात साजरा केला. याप्रसंगी त्यांच्या वतीने शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. पवार यांच्या या अनोख्या आणि स्तुत्य उपक्रमाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

शैक्षणिक साहित्याने सुखावले बालपण
वाढदिवसाचे औचित्य साधून महादेव पवार यांच्या वतीने आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या, पेन यांसह शैक्षणिक साहित्य आणि केळींचे वाटप करण्यात आले. साहित्याचे वाटप होताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता.

अन् पवार भारावून गेले...
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुमारी सविता माने आणि तपस्या मदने या विद्यार्थिनींनी महादेव पवार यांना पारंपरिक पद्धतीने औक्षण करून उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर संस्थेच्या वतीने अशोक बनकर यांच्या हस्ते पवार यांचा पुष्पहार आणि शाल देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

"या संस्थेचे कार्य अत्यंत पवित्र आणि कौतुकास्पद आहे, त्यामुळे मी पुरता भारावून गेलो आहे. या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हसू मला ऊर्जा देते. म्हणूनच सलग चौथ्या वर्षी मी या माऊलींच्या कुशीत वाढदिवस साजरा करत आहे. इथल्या विद्यार्थ्यांमध्ये रमणे आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणे मला आत्मिक समाधान देते."
— महादेव पवार (जिल्हा संघटक, शिवसेना)

हितचिंतकांची उपस्थिती
या आगळ्यावेगळ्या वाढदिवस सोहळ्याला महादेव पवार यांचा मोठा मित्रपरिवार, शिवसेना पदाधिकारी तसेच एकलव्य आश्रमशाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप कुमारी चंचल पवार हिने मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाला.

सध्याच्या काळात वाढदिवसावर लाखो रुपयांची उधळपट्टी करणाऱ्यांसाठी महादेव पवार यांनी आदर्श घालून दिला असून, ‘पुढारी’ परिवारातर्फेही त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment

0 Comments