धाराशिव | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
दि पिपल मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. या अग्रगण्य वित्तीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, आमदार अभिजीत (आबा) पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धाराशिव आणि पंढरपूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधीलकी जपण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमास संस्थेचे कर्मचारी, 'श्री विठ्ठल परिवार' चे पदाधिकारी आणि हितचिंतकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
धार्मिक व सांस्कृतिक वातावरणात प्रारंभ
कार्यक्रमाचा प्रारंभ श्री गणेश प्रतिमा, श्री विठ्ठल-रुक्मिणी प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने अत्यंत मंगलमय व उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या स्नेहमयी सोहळ्यास संस्थेचे मार्गदर्शक आणि धुरंधर नेतृत्व प्रामुख्याने उपस्थित होते:
मार्गदर्शक: श्री. आनंदबापू पाटील, श्री. विक्रमभैया पाटील, श्री. प्रदीप खामकर, श्री. मोहन सुरवसे.
संचालक मंडळ: व्हॉईस चेअरमन श्री. संजय खरात, संचालक श्री. संदेशकुमार दोशी, श्री. अनिल यादव, श्री. सुरेश (तात्या) सावंत, श्री. दिनेश शिळ्ळे.
प्रशासकीय प्रमुख: मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोविंद भुतेकर, सरव्यवस्थापक श्री. शशिकांत जगताप.
रक्तदात्यांचा उदंड उत्साह
"सामाजिक उत्तरदायित्व हेच आमचे कर्तव्य" या भावनेतून आयोजित या शिबिरात दि पिपल मल्टीस्टेटचे सर्व कर्मचारी, संस्थेचे ठेवीदार आणि श्री विठ्ठल परिवारातील असंख्य कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान केले. वाढदिवसाच्या दिवशी फुलांच्या हारांऐवजी जीवनदायी रक्तदानाचा उपक्रम राबवून लोकप्रतिनिधीच्या वाढदिवसाला सामाजिक उपक्रमाची जोड दिल्याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
0 Comments