Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मंगरूळ PHC मधील बंद पडलेल्या रक्तचाचण्या तात्काळ सुरू करा; जिल्हा परिषद सदस्या सिमाताई माडजे आक्रमक! जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले निवेदन; स्टाफ क्वार्टर्स दुरुस्ती व उपकेंद्रांवर टॉयलेटची सोय करण्याची मागणी

 तुळजापूर | Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) बंद करण्यात आलेल्या महत्त्वाच्या रक्तचाचण्या पुन्हा सुरळीत कराव्यात, तसेच आरोग्य केंद्र व सर्व उपकेंद्रांची दुरवस्था तातडीने दूर करावी, या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्या तथा मंगरूळ PHC रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्षा सौ. सिमाताई भैरवनाथ माडजे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले व प्रशासनाचे लक्ष वेधले.

मंगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता, बंद पडलेल्या HbA1c (मधुमेहाशी संबंधित), व्हिटॅमिन B-12 आणि व्हिटॅमिन D3 या अत्यावश्यक रक्तचाचण्या (Blood Tests) तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

उपकेंद्रांची दुरवस्था व स्वच्छतागृहांचा प्रश्न ऐरणीवर
निवेदनात नमूद केल्यानुसार, मंगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्टाफ क्वार्टर्सची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. तसेच मंगरूळ PHC सह सर्व उपकेंद्रांवर नवीन स्वच्छतागृहांची (Toilet) सोय करण्यात यावी आणि दुरवस्था झालेल्या उपकेंद्रांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी आग्रही मागणी सौ. सिमाताई माडजे यांनी केली.

या उपकेंद्रांच्या दुरुस्तीची मागणी:
१) चिंचोली,२) आरळी बु.,३) कुंभारी,४) तीर्थ खु.,५) ढेकरी,६) बोरी,७) मंगरूळ (ता. तुळजापूर) यावेळी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित विभागाला सकारात्मक कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. या मागणीमुळे मंगरूळ व परिसरातील ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी व सामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा सुरळीत मिळण्यासाठी हा पाठपुरावा महत्त्वाचा मानला जात आहे.

Post a Comment

0 Comments