Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

टीव्ही, मोबाईल बंद अभियानाला सावरगावमध्ये प्रतिसाद; 'आपला जीव धाराशिव' उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद


'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
 काटी | उमाजी गायकवाड 
जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांच्या कल्पनेतून साकारलेल्या 'आपला जीव धाराशिव व्हिजन-२०३०' या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या 'रात्री ७ ते ९ टीव्ही व मोबाईल बंद' अभियानाला तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी काटी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ.आशाताई भाले यांचे प्रतिनिधीं त्यांचे पती बाळासाहेब भाले यांनी नुकतीच सावरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांशी थेट संवाद साधला.

डिजिटल युगात मोबाईल आणि टीव्हीच्या आहारी जाणाऱ्या बालपिढीला अभ्यासाकडे वळवण्यासाठी तसेच कौटुंबिक संवाद पुनर्स्थापित करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. पंचायत समिती सभापती विक्रमसिंह देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संतोष बोबडे आणि माजी जि. प. सदस्य राजकुमार पाटील यांच्या सूचनेनुसार काटी गटातील प्रत्येक शाळेत जाऊन या उपक्रमाचा आढावा घेतला जात आहे.

या पार्श्वभूमीवर, काटी जि. प. सदस्या सौ. आशाताई भाले यांचे प्रतिनिधी बाळासाहेब भाले यांनी सावरगाव शाळेस भेट दिली.

अभियानाची ठळक वैशिष्ट्ये व झालेले बदल:
एकाग्रतेत वाढ: रात्री ७ ते ९ या वेळेत स्क्रीन (टीव्ही व मोबाईल) बंद राहिल्यामुळे विद्यार्थ्यांना सलग दोन तास एकाग्रतेने स्वाध्याय व वाचन करण्याची सवय लागत आहे.

कौटुंबिक संवाद: डिजिटल साधनांचा वापर थांबल्यामुळे घरातील वातावरण अभ्यासपूरक बनत असून, पालकांचा मुलांशी असणारा संवाद वाढला आहे.

पालकांचा सकारात्मक कौल: स्क्रीन-टाईम कमी झाल्याने मुलांच्या वर्तनात आणि अभ्यासातील रुचीत सकारात्मक बदल दिसून येत असल्याने पालकांनी या अभियानाचे स्वागत केले आहे.

पालकांमध्ये समाधानाचे वातावरण: मोबाईलच्या अतिवापरापासून मुले दूर जात असून त्यांच्या अभ्यासातील प्रगती पाहून पालकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आहे.

अभ्यासात एकाग्रता: दररोज रात्री ७ ते ९ या वेळेत टीव्ही व मोबाईल पूर्णपणे बंद ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांना २ तास एकाग्रतेने आणि शांत वातावरणात अभ्यास करण्याची सवय लागत आहे.

कुटुंबातील संवाद वाढला: या २ तासांच्या स्क्रीन-फ्री वेळेमुळे घरातील कौटुंबिक संवाद आणि आत्मीयता वाढण्यास मदत होत आहे.

प्रत्येक घरात अंमलबजावणीचे आवाहन: हा उपक्रम केवळ कागदावर न राहता गावातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या वेळी शाळेच्या वतीने बाळासाहेब भाले यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मुख्याध्यापक रमाकांत गुरव, ग्रामपंचायत सदस्य रोहित पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अतुल पवार, उपाध्यक्ष सुनील शिंदे,  ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ डोलारे, विशाल माळी यांच्यासह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. हा उपक्रम गावातील प्रत्येक कुटुंबाने नियमित पाळावा, असे आवाहन बाळासाहेब भाले यांच्या वतीने यावेळी करण्यात आले.

Post a Comment

0 Comments