काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे विजयादशमीच्या मुहूर्तावर शनिवार दि. 12 रोजी सकाळी 11:00 वाजता येथील काटी-धामणगाव रोडवर भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.अनिल काळे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेल्या तुळजापूर शुगर प्रा. लिमिटेड या गुळ पावडर कारखान्याचा विविध मान्यवर व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कारखान्याचा पहिल्या हंगामाचा पहिला बॉयलर अग्निप्रदिपनाचा तुळजापूर शुगरचे चेअरमन ॲड.अनिल काळे यांच्या हस्ते समारंभ होणार आहे.
काटीसह परिसरातील गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा शेतात उभा असलेला ऊस चिंतेचे कारण ठरत होता. कारखानदार ऊस नेत नसल्याने या परिसरात अनेक शेतकऱ्यांनी आपले ऊसाचे क्षेत्र कमी केले. मागील तीन-चार वर्षांपासून या भागात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या भागात ऊसाचे क्षेत्र देखील वाढणार आहे.
काटी येथे साकारण्यात येत असलेल्या तुळजापूर शुगर गुळ पावडर कारखान्याची गाळप क्षमता ही दिवसाला एक हजार टणाची असून हंगाम पुर्ण होईपर्यंत दोन लाख टणाचे गाळपाचे उदिष्ट असून शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांना त्यांच्या वाहतुकीसह ऊसाचे पैसे देखील वेळेत देण्यासाठी कारखान्याची वाटचाल राहणार आहे.
या भागातील शेतकऱ्यांचा ऊस हंगाम निघून गेला तरी शेतातला ऊस कारखान्याला जात नव्हता. ॲड.अनिल काळे यांनी ऊस उत्पादक शेतकरी मोठा झाला पाहिजे हे ध्येय ठेवून तुळजापूर शुगर गुळ पावडर कारखाना हि संकल्पना पुढे आणत या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुळजापूर शुगर गुळ पावडर कारखान्याच्या माध्यमातून पर्याय निर्माण झाला आहे.
तरी काटीसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी,नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तुळजापूर शुगरच्या बॉयलर अग्निप्रदिपनाच्या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तुळजापूर शुगरचे चेअरमन ॲड.अनिल काळे यांनी केले आहे.
0 Comments