Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

प्रभू श्रीरामांची जन्मभूमी अयोध्या येथून आलेल्या आमंत्रित अक्षता कलशाची काटी व सावरगाव येथे भव्य शोभायात्रा

काटी/उमाजी  गायकवाड
प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या आयोध्या येथून आलेल्या  आमंत्रित अक्षता कलशाची गुरुवार  दि.4 रोजी तुळजापूर तालुक्यातील काटी येथे तर मंगळवार दि. 9 रोजी  सावरगाव येथे प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी दोन्ही  ठिकाणी अतिशय भक्तीमय वातावरणाने व श्री प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने काटी  व सावरगाव नगरी दुमदुमली होती.

अयोध्या येथे येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे भव्य श्रीराम मंदिराचे स्वप्न साकार होणार असून त्या दिवशी प्रभू श्रीराम  जन्मभूमी आयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्याअनुषंगाने  देशातील कानाकोपऱ्यात आमंत्रित मंगलअक्षता पोहोचण्यात येत आहेत. काटी व सावरगावात अक्षता पोहोच झाल्यानंतर  अक्षताकलशासह प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. काटीत सायंकाळी दत्त मंदिरापासून तर सावरगावत  हनुमान मंदिरातून या शोभायात्रेस प्रारंभ झाला. शोभा यात्रेसाठी काटीत भजनी मंडळाच्या वतीने टाळ मृदंगाच्या गजरात, पालखी सोहळ्यात श्रीरामांच्या जयघोषात शोभायात्रा काढण्यात आली तर सावरगावात श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आकर्षक रथ ,डॉल्बी ,फटाक्यांच्या आतषबाजीचे  नियोजन करण्यात आले होते. यावेळी उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील रामभक्त टाळकरी मंडळाच्या टाळवाद्याने सर्वांचे  लक्ष वेधले  होते. तर काटी व सावरगावात महिलांनी आपआपल्या घरासमोर सडा -रांगोळी करून प्रभुरामांच्या प्रतिमेचे मनोभावे पूजन करत दर्शन घेतले.

ही भव्य शोभायात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी काटीत हभप सुनील महाराज ढगे, संपत्त पंखे, ज्ञानेश्वर गुरव,अविनाश देशमुख, सचिन  साळुंके, मनोज हंगरकर, अमर देशमुख, मनोहर कदम, अक्षय नारगुडे, संग्राम हंगरकर, सुर्याजी चिवरे, शाम चव्हाण, रामचंद्र मासाळ, किरण देवकते आदींसह भजनी मंडळातील सभासदांनी परिश्रम घेतले तर सावरगाव येथे हभप सचिन जोशी,हभप एकनाथ हुरडे,हभप आबा लिंगफोडे, हनुमंत गाभणे,बालाजी शिंदे, जग्गनाथ काडगावकर, बाळासाहेब शिंदें,काशिनाथ राऊत,नेताजी कदम,ओंकार काडगावकर, अनिल माळी,रमेश काडगावकर गुरुनाथ लिंगफोडे,राजेंद्र तोडकरी, प्रा.कानिफनाथ माळी,राहुल अक्कलकोटे, सुधाकर तानवडे,मुकुंद कुलकर्णी यांच्यासह श्रीराम प्रतिष्ठान आणि सकल हिंदू-धर्म बांधवांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments