धाराशिव:- येथील तुळजापूर रस्त्यावरील कुष्ठधाम वसाहतीत उपचारासाठी दाखल झालेले कुष्ठरोगी तसेच काही निराधार रुग्ण यांच्या जीवनात दिवाळीचा आनंद निर्माण व्हावा तसेच त्यांना दिवाळी फराळ, गोडधोड याचा लाभ मिळावा म्हणून येथील रुक्मिणी फाऊंडेशनचे सचिव प्रा.अभिमान हंगरगेकर यांचे नातु चि.त्रिशांक दत्तात्रय निकम याच्या नामकरण सोहळ्याचे औचित्य साधून हंगरगेकर व निकम परिवारातर्फे येथील कुष्ठधाम वसाहतीत रुग्णांना फळे व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी रुक्मिणी फाऊंडेशन चे सचिव प्रा.अभिमान हंगरगेकर,सुनंदा हंगरगेकर,प्रा.श्वेता दत्तात्रय निकम, प्रणिता विपुल पाटील,कु.आराध्या पाटील, जिजा पाटील,त्रिशांक निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments