तुळजापूर/काटी:- तालुक्यातील काटी येथील हुतात्मा गणपतराव देशमुख यांचे सुपुत्र डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे नातु अर्णव अशोकराव माने(सी.ए.)यांची भारतातील एक नंबरची बॅंक म्हणजे पंजाब नॅशनल बँकेत ऋण अधिकारी म्हणून नुकतीच निवड झाली आहे.मुंबईतील पंजाब नॅशनल बँकेच्या एक्स्ट्रा लार्ज कार्पोरेट शाखेत ऋण अधिकारी म्हणून निवड झाली आहे.ही शाखा नाबार्ड,सीडबी या सारख्या वित्तीय संस्थाना कर्जपुरवठा करते.
अर्णव माने हे वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी सी.ए.झाले.व वयाच्या 24 व्या वर्षी पंजाब नॅशनल बँकेत त्यांची निवड झाली.या निवडीबद्दल प्राचार्य डाॅ जयसिंगराव गणपतराव देशमुख यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी सौ.शिलादेवी जयसिंगराव देशमुख,श्रीमंत सौ.स्वाती संजय सरदेसाई,श्रीमंत सौ.शिवांजली शाहुराजे भोसले,हितेश जयसिंगराव देशमुख,प्राचार्या सौ.मंजुश्री हितेश देशमुख,कु.समृध्दी संजय सरदेसाई(सी.ए.फायनल)यांची प्रमुख उपस्थिती होती.सौ.शिलादेवी जयसिंगराव देशमुख यांनी प्रोत्साहन दिल्यामुळेच अर्णव माने यांनी हे उत्तुंग यश मिळवले असे सांगितले.अर्णव माने यास काटीकर देशमुख परिवारातर्फे पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
0 Comments