तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडीतील महा विकास आघाडीतील कार्यकर्त्यांसह सरपंच महादेव जाधव विजयाचा जल्लोष साजरा करताना....
काटी/उमाजी गायकवाड
कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या तुळजापूर तालुक्यातील काटी जिल्हा परिषद गटातून लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांनी चांगले मताधिक्य घेतले असतानाच रविवार दि. 23 रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत महायुतीचे भाजपचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी जोरदार बाजी मारत काटी जिल्हा परिषद गटातील काटीतून 584 मतांची लिड, सावरगावमधून 462, वडगाव (काटी) 47, पांगरदरवाडी 87,वाणेवाडी ग्रुप ग्रामपंचायत मधून 421,दहिवडी 77, गंजेवाडी 217, गवळेवाडी 167 अशी एकूण 2062 मतांची लिड घेतली आहे. महा विकास आघाडीतील कॉंग्रेसचे ॲड.कुलदीप उर्फ धिरज अप्पासाहेब पाटील यांनी पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरुन नशीब आजमावले होते.
लक्षवेधी ठरलेल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा आपली विजयाची परंपरा कायम राखली आहे. या अटीतटीच्या निवडणुकीत राणाजगजितसिंह पाटील यांना 1,30,552 तर प्रतिस्पर्धी असलेल्या महाविकास आघाडीतील कॉंग्रेसचे ॲड.कुलदीप उर्फ धिरज पाटील यांनी 93,842 मतदान घेतले. त्यामुळे या निवडणुकीत 36510 मतांच्या फरकाने भाजपचे राणाजगजितसिंह पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला.
राणाजगजितसिंह पाटील यांचा विजय झाल्यानंतर महायुतीच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
0 Comments