Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

कुंभारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा

तुळजापूर/उमाजी  गायकवाड 
विविध धर्म, संप्रदाय, भाषा, चालिरीती असतानाही, सर्वांमध्ये एकात्मता उत्पन्न करणारे असे देशाचे संविधान आहे. २६ नोव्हेंबर हा देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने संविधान स्वीकारले व 26 जानेवारी 1950  रोजी संविधान लागू झाले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने संविधान स्विकारल्या 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. त्याअनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवार दि. 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी सहशिक्षक पोपट सुरवसे व विजयकुमार गायकवाड यांनी 
भारतीय संविधानाने आपल्या देशात अद्वितीयरितीने लोकशाही शासन दृढमूल केल्याचे व संविधानाचे आपल्या जीवनात महत्व असून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग प्रतिभेची ते साक्ष असल्याचे  सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक पोपट सुरवसे तर आभार विजयकुमार गायकवाड यांनी मानले.

यावेळी तात्यासाहेब पारधे, लक्ष्मीताई पारधे,रेश्माताई दिलपाक, अंगणवाडी सेविका मेघा इंगळे, सहशिक्षक पोपट सुरवसे, विजयकुमार गायकवाड, सहशिक्षिका वासंती गायकवाड, सुप्रिया स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments