Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

माझा पराभव मतदारांकडून नाही तर ईव्हीएम घोटाळ्यामुळे पराभव; उच्च न्यायालयात दाद मागणार... --देवानंद रोचकरी

तुळजापूर:- विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील जनतेने भरभरून मते दिली, परंतु ईव्हीएम घोटाळ्यामुळे आम्हाला पराभवाचा सामना करावा लागल्याचे सांगून या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे समाजवादी पक्षाचे देवानंद रोचकरी यांनी तुळजापूर  येथील आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
     
तुळजापूर शहरातील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेचे  आयोजन केले होते. त्यावेळी देवानंद (भाऊ)रोचकरी बोलत होते. विधान सभा निवडणूकीत तालुक्यात चांगले वातावरण होते. या निवडणूकीत तुळजापूर शहरातील प्रचंड रॅली तसेच नळदुर्ग शहरातील भव्य सभेनंतर वातावरण पूर्ण पणे बदल झाला होता. देवराज मित्र मंडळाचे तालुक्यात 40 हजार सभासद असून 1 लाख 20 हजार मतदान गृहीत धरण्यात आले होते. मात्र केवळ 15 हजार मतदान दाखवण्यात आले असून अनेक मतदान केंद्रावरील दोन अंकी मतदान ईव्हीएम घोटाळ्यावर शिक्कामोर्तब करत असल्याचे रोचकरी यांनी स्पष्ट केले आहे. या विरोधात मतमोजणी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली मात्र दखल घेतली नसल्याने या विरोधात उच्च न्यायालय दाद मागणार असल्याचे रोचकरी यांनी सांगीतले आहे. यावेळी ॲड उदय भोसले यांची उपस्थिती होती.

 पत्रकार परिषदेत समाजवादी पार्टीचे नेते देवानंद रोचकरी संवाद साधताना....

पुन्हा  धैर्याने कामाला लागणार
देवराज मित्र मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मंगळवार (दि. 26)  बैठक बोलावण्यात आले असून बैठकीत निवडणुकीवर विचार मंथन करण्यात येणार आहे तसेच यावेळी पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचे रोचकरी यांनी सांगितले. निवडणुकीत झालेला पराभव विसरून आम्ही पुन्हा कामाला लागणार असल्याचे रोचकरी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. 

रोचकरींचे निवासस्थान असलेल्या बूथवर दोन मते
   तुळजापूर शहरात विद्यमान आमदारा विरोधात जनतेत नाराजी होती. मंदिरातील प्रश्नावर पुजाऱ्यांची नाराज होती. मात्र असे असतानाही आम्हाला मिळालेली मते अत्यंत कमी असून शंकेला वाव असल्याचे रोचकरी यांनी सांगीतले. विशेष म्हणजे रोचकरी यांचे निवासस्थान असलेल्या बूथ वर केवळ दोन मते दाखवण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments