काटी/उमाजी गायकवाड
ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीने आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी तुळजापूर तालुक्यातील दहिवडी येथे बुधवार दि. 10 रोजी दुपारी 1:30 वाजनेच्या दरम्यान सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत व जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या हस्ते ऑनलाईन व्हीसीद्वारे येथील नुतन आरोग्य उपकेंद्राचे भुमिपूजन करण्यात आले.
यावेळी सरपंच रूपाली प्रशांत गाटे,आरोग्य अधिकारी डॉ.नितीन गुंड, उपसरपंच साधना मंडलिक, ग्रामपंचायत सदस्य सचिन गाटे, विठ्ठल गायकवाड, संजय आदलिंगे, कल्पना अंबुरे, पोलीस पाटील रमेश गाटे, तानाजी गाटे, रवींद्र अंबुरे, बदाले मॅडम डॉ. प्रमोद अंबुरे डॉ. नदाब, सहशिक्षक हर्षवर्धन माळी, सोनवणे , आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments