मुरुम/प्रतिनिधी
लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने ई. व्ही. एम्. व्ही. व्ही. पॅड मतदान यंत्राद्वारे उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघात मतदान यंत्राद्वारे जनजागृती अभियान मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानाची एल. ई. डी. व्हॅन शहरात आली. दरम्यान नगर परिषद येथे मतदान यंत्राद्वारे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. आगामी ४० धाराशिव लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २४० उमरगा-लोहारा विधानसभा मतदार संघासाठी जनजागृतीसाठीचे ई. व्ही. एम. व्ही. व्ही. पॅड यंत्र तहसील कार्यालयास प्राप्त झाले असून दि. १० डिसेंबर ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत उमरगा लोहारा विधानसभा मतदार संघात मतदान यंत्राद्वारे जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी एल. ई. डी. वाहनाची व्यवस्था करण्यात आली असून सदर वाहनासोबत शस्त्रधारी पोलीस, मास्टर ट्रेनर, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक, कोतवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर वाहनासोबत नियोजनाप्रमाणे मतदार संघातील सर्व गावांमध्ये मतदान यंत्राद्वारे जनजागृतीसाठी जात आहे. त्यामध्ये नागरिकांना ई. व्ही. एम. व व्ही. व्ही. पॅड यंत्र कसे हाताळावे, याबाबत प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात येत आहे.
या अभियानाची मोहीम शहरातील नगरपरिषद येथे मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आले.
यावेळी मास्टर ट्रेनर अतुल सगर, इ. एम. कोंगलवार, डी.बी. जाधव, लक्ष्मीकांत पटणे, पोलीस नायकल व्ही.जी. साळुंखे, कोतवाल तेजूसिंग जाधवसह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी शहरातील नागरिकांना मतदान प्रक्रिया समजून सांगत ई. व्ही. एम. व व्ही. व्ही. पॅड यंत्र हाताळणी, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया समजून घेणे, आपल्या शंका समाधान करुन घेणे यासह अन्य माहिती देण्यात आली.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236
0 Comments