Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील स्वामी समर्थ दूध डेअरी शुभारंभास दूध उत्पादक शेतकरी व ग्राहकांचा मोठा प्रतिसाद

काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील स्वामी समर्थ दूध डेअरीच्या  शुभारभास दूध उत्पादक शेतकरी व ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

बुधवार दि. 10 रोजी सकाळी दहा वाजता स्वामी समर्थ दूध डेअरीची पूजा चालक ग्रामपंचायत सदस्य भैरी काळे यांच्या हस्ते विधिवत पूजा करुन संपन्न झाली. त्यानंतर उपस्थित सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, उपसरपंच जुबेर शेख, प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, प्रकाश गाटे, ग्रामपंचायत सदस्य अनिल बनसोडे,चंद्रकांत काटे,भोलेनाथ  बनसोडे आदींसह दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्य भैरी काळे यांच्या स्वामी समर्थ दूध डेअरीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या नव्याने सुरु करण्यात आलेल्या डेअरीसाठी शुभेच्छा  दिल्या.

यावेळी दूध डेअरी चालक भैरी काळे यांनी शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव देऊन सामान्यांची सेवा करण्याचा संकल्प व्यक्त करुन या दूध डेअरीच्या माध्यमातून काटीतील नागरिकांना शुध्द ताजे दूधासह पणीर, तूप, दही, ताक, बासुंदी, खवा, मलई दहि, मठ्ठा, श्रीखंड, आम्रखंड, आईस्क्रीम आदी दुग्धजन्य पदार्थ मिळणार असल्याचे सांगितले.

यावेळी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, उपसरपंच जुबेर शेख, प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, प्रकाश गाटे, पत्रकार उमाजी गायकवाड, चंद्रकांत काटे, ग्रामपंचायत सदस्य अनिल बनसोडे,शिवलिंग  घाणे, सचिन भोजने, भोलेनाथ बनसोडे,सुनिल परिट,सुनिल गायकवाड, मोहन शिंदे,सचिन  इंगळे,सुभाष गायकवाड,तानाजी ढगे, नागेश काळे, राजू वाडकर,शहाजी काळे,शाम सावंत, संतोष काळे, प्रविण विभूते,नरसु काळे,दादा काळे,रामचंद्र ढगे,राजेंद्र हजारे, बलभिण काळे,श्रीकात हजारे,पंकज भापकर,विलास कुलकर्णी,गणेश काळे,विजय खरात,हनुमंत ढगे,धैर्यशील गाटे आदी मान्यवरांसह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236



Post a Comment

0 Comments