Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

गंधोरा येथील इंदिरा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक विजयकुमार नवले यांच्या सेवावृत्ती निमित्ताने सत्काराने निरोप

तुळजापूर/प्रतिनिधी 
तालुक्यातील गंधोरा येथील इंदिरा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक विजयकुमार नवले यांना सेवानिवृत्ती सत्कार करून निरोप देण्यात आला. मुख्याध्यापक नवले यांनी ३२ वर्षे ज्ञानदानाचे कार्य केले आहे.  
  विद्यालयात आयोजित कार्यक्रमात नळदुर्ग च्या हुतात्मा बाबुराव बोरगावकर विदयालयाचे मुख्यध्यापक राजकुमार नरवडे यांचा हस्ते नवले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीनिवास भोसले, शरद जाधव, गुलमीर शेख, स्वामी आदि शिक्षकांची उपस्थिती होती. मुख्याध्यापक नवले यांनी   नरेंद्र बोरगांवकर विद्यालय देवकुरळी,  इंदिरा गांधी विद्यालय गंधोरा, मधुकरराव चव्हाण विदयालय केमवाडी,  छत्रपती शिवाजी विद्यालय पिंपळा व अहिल्यादेवी होळकर विदयालय कार्ला आदी शाळेत मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली आहे. 

Post a Comment

0 Comments