धाराशिव: महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या धाराशिव मंडळ जिल्हाध्यक्षपदी बी.बी.जगदे यांची पुन्हा एकदा बहुमताने फेरनिवड करण्यात आली आहे. तर, सचिवपदी नूर शेख यांची निवड झाली आहे. तुळजापूर येथे शनिवार, 14 फेब्रुवारी रोजी येथील नळदुर्ग रोडवरील श्रीनाथ लॉंन्स येथे संपन्न झालेल्या संघटनेच्या वार्षिक संयुक्त आढावा बैठकीत ही घोषणा करण्यात आली.
तुळजापूर येथील बैठकीस परिमंडळ अध्यक्ष राजेंद्र गायकवाड,उपाध्यक्ष दीपक कोथले आणि बीड मंडळ सचिव मुजम्मिल शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या 15 वर्षांपासून धाराशिव मंडळात संघटनेचे कामकाज बी. बी.जगदे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत प्रभावीपणे सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी दिलेल्या लढ्याची आणि कार्याची दखल घेत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर पुन्हा अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे.
अशी आहे नवनिर्वाचित कार्यकारिणी:
या बैठकीत नव्याने जाहीर झालेल्या कार्यकारिणीत संघटनेच्या अध्यक्षपदी बी.बी. जगदे,सचिवपदी नूर शेख, कार्याध्यक्षपदी निशिकांत सगवे,संघटक दिलीप घाटेराव, उपाध्यक्ष अनिल चौदंते,सहसचिव अनिल पवार, कोषाध्यक्ष सी.आर.खोत,कार्यकारिणी सदस्य संजय माळाळे, बालाजी वाघमारे,धम्मचित रणदिवे यांच्या निवडीची एकमताने घोषणा करण्यात आली. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या बैठकीस जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
कर्मचारी हा संघटनेचा कणा! आगामी काळात कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्या व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन
--नवनिर्वाचित अध्यक्ष बी.बी.जगदे
"माझ्या कामावर विश्वास ठेवून संघटनेने पुन्हा एकदा ही जबाबदारी दिली आहे. गेल्या दीड दशकातील कामाची पावती फेरनिवडीच्या रूपाने मिळाली आहे. कर्मचारी हा संघटनेचा कणा असून आगामी काळात कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि पदोन्नतीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही अधिक आक्रमकपणे काम करू तसेच कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध राहीन त्यासोबत सर्वांना सोबत घेऊन संघटनेची ताकद वाढवणे हेच माझे मुख्य ध्येय असेल."
— बी. बी.जगदे नवनिर्वाचित अध्यक्ष, महावितरण धाराशिव मंडळ
0 Comments