काटी/उमाजी गायकवाड
भारतीय जनता पार्टी-महाराष्ट्र प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवार दि.30/12/23 रोजी वसंत स्मृती दादर मुंबई येथे झाली. या बैठकीत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा तुळजापूर शुगरचे चेअरमन व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बावनकुळे व विक्रांत (दादा) पाटील यांचे निकटवर्तीय भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.अनिल काळे यांच्या कार्याची दखल घेऊन महाविजय-2024 सुपरवारीयर्स मराठवाडा-विभागीय सहसमनव्यकपदी नियक्ती केली आहे. या नियुक्तीमळे मराठवाडा पातळीवर काम करण्याची संधी ॲड. अनिल काळे यांना मिळाली आहे. या नव्या जबाबदारीमुळे त्यांच्यावर मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यातील 100 सक्षम कार्यकर्ते म्हणजे सुपरवारीयर यांना कामास लावून ते सक्षम झाले तर मराठवाड्यातील सर्व आमदार खासदार यांना निवडून येतील अशा प्रकारची जबाबदारी मिळाली आहे.
या निवडीबद्दल प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुभेच्छा दिल्या असून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आ.आशिष शेलार आ.श्रीकांत भारती,आ. प्रवीण दरेकर आ. राणा जगजितसिंह पाटील आ. सुजितसिंह ठाकूर ॲड .मिलिंद पाटील तसेच भाजपचे धाराशिव जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236
0 Comments