धाराशिव: ज्ञान भारतम मिशन समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल प्रा. अभिमान हंगरगेकर यांचा धाराशिव जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत सत्कार करताना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे आणि पतसंस्थेचे पदाधिकारी.
धाराशिव | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
रुक्मिणी फाऊंडेशनचे सचिव प्रा. अभिमान हंगरगेकर यांची 'ज्ञान भारतम मिशन'च्या जिल्हा शासकीय समितीवर सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल धाराशिव जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पतसंस्थेच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून शाल व गुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.
येथील बार्शी नाक्यावरील स्वयंवर मंगल कार्यालयात ही सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविकानंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि पालकांचाही यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, धाराशिव पंचायत समितीच्या सभापती गोकर्णा कदम, विस्तार अधिकारी दत्तप्रसाद जंगम व दैवशाला हाके, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, पतसंस्थेचे चेअरमन शेरोराव राठोड, व्हाईस चेअरमन कांतीलाल ढोले आणि सचिव उषा भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी एल. बी. पडवळ, रामकृष्ण मते, संचालक मंडळाचे सदस्य, तक्रार निवारण समितीचे पदाधिकारी, संतोष देशपांडे, धनंजय मुळे, दयानंद जवळगावकर, दादासाहेब हंगरकर, अनिल हंगरकर, हर्षवर्धन माळी, बापू काळे, सोमनाथ जामगावकर, कल्पना गाटे, अर्जुन गुंजाळ, राहुल भंडारे, दत्तात्रय कदम, मोहन जगदाळे, प्रशांत गायकवाड, सुनील गपाट, अमरसिंह गोरे, रवींद्र कापसे, जयश्री माळी, राजेंद्र गव्हाणे, वैजिनाथ नरके, उमेश भोसले, श्रीमंत चौरे, ज्ञानेश्वर देवराम, राहुल थोडसरे, बालाजी पडवळ, जयसिंग गोरे, शिवाजी शिंदे, नागेश स्वामी, सुनील सूर्यवंशी, प्रशांत मिटकर यांसह शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील क्षीरसागर व शाम नवले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार हनुमंत पडवळ यांनी मानले. स्नेहभोजनाने सभेची सांगता झाली.
0 Comments