Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

ढोकीच्या यशदा मल्टीस्टेट बँकेत श्री गणरायाची आरती संपन्न; पत्रकार सुरेश कदम यांच्या हस्ते पूजन

ढोकी /प्रतिनिधी | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील यशदा मल्टीस्टेट बँकेच्या शाखेत आराध्य दैवत श्री गणेशोत्सवानिमित्त सहाव्या दिवशीच्या आरती पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. जिल्हा मराठी पत्रकार संघाचे धाराशिव तालुका उपाध्यक्ष तथा दैनिक ‘पुण्यनगरी’चे स्थानिक पत्रकार सुरेश कदम यांच्या हस्ते शनिवारी (दि. १९) श्री गणरायाची भावपूर्ण आरती व पूजन करण्यात आले.

आरती सोहळ्यानंतर बँकेच्या वतीने पत्रकार सुरेश कदम यांचा यथोचित सत्कार करून त्यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आली.

या प्रसंगी यशदा मल्टीस्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रकाश थोडसरे, लिपिक सुनील कोळपे, कॅशियर ज्योती देशमुख, लिपिक विवेक केसकर यांच्यासह गावचे ग्रामस्थ उदय देशमुख, प्रमोद तिवारी, लखन तिवारी, श्री. पुदाले यांच्यासह परिसरातील नागरिक व बँकेचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments