Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सुपरवॉरियर हा भारतीय जनता पार्टीला प्रत्येक निवडणुकांमध्ये यश मिळवून देणारा सुपर हिरो ठरणार-- ॲड.अनिल काळे

 तुळजापूर/उमाजी गायकवाड
तुळजापूर येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात बुधवार  दि.3 रोजी सुपर वॉरियर या प्रमुख विषयानवर  बैठक संपन्न झाली.

या बैठकीत महाविजय 2024 सुपरवॉरीयर मराठवाडा विभागीय सहसमनव्यकपदी भाजपचे  प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा तुळजापूर शुगरचे चेअरमन ॲड. अनिल काळे यांची निवड झाली. त्याबद्दल  तुळजापूर भाजपच्या वतीने त्यांचा शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत यथोचित सत्कार करण्यात  आला.

या बैठकीत  संबोधित करताना प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.अनिल काळे म्हणाले की, विधानसभा मतदार संघातील 100 सुपरवॉरीयर हे पुढील 15 वर्षाचे नेतृत्व असणार आहेत. त्यामुळे चांगले काम करणाऱ्या सुपरवॉरीयरमधूनच जि.प. सदस्य, प.स. सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार होणार आहेत प्रत्येक सुपर वॉरियर्सनी प्रत्येक गावात जाऊन बुथवर 100 ते 150 कार्यकर्त्याची बैठक घ्यायची आहे. त्या बैठकीतून  एका बुथ प्रमुखाची नेमणूक  करुन त्या बुथ प्रमुखाला मान, सन्मान देऊन त्यांचा जाहीर सत्कार करावयाचा आहे. तसेच  त्यांचा बॅनरवर फोटो घ्यावा लागणार  आहे. त्यासाठी आपणास सक्षम अशा बुथ प्रमुखांची नेमणूक  करावी लागणार आहे. जेणे करून त्या बूथ मध्ये 51 टक्के मतदान भाजप उमेदवाराला झाले पाहिजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान म्हणून मा.नरेंद्र मोदींना पंतप्रधान तर मा.ना. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायचे आहे. त्याच बरोबर  तुळजापूर तालुक्याचे विद्यमान  आमदार राणाजगजितसिंह (दादा) पाटील यांना 50,000 हजारांपेक्षा  जास्त मताधिक्याने निवडून आणावयाचे आहे. यासाठी आपण सर्वजण मिळून बूथ सक्षम करण्याचे  आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी नेताजी पाटील, साहेबराव घुगे, भाजपचे  जिल्हा सरचिटणीस दीपक आलुरे, राजसिंह राजेनिंबाळकर,आनंद कंदले यांचेही मार्गर्शन झाले. तसेच आमदार राणाजगजितसिंह (दादा) पाटील यांनीही कार्यकर्त्यांना ऑनलाईन सवांद साधला. 

यावेळी विक्रमसिंह देशमुख, भाजपचे  तालुकाध्यक्ष संतोष (दादा) बोबडे, राजकुमार पाटील, प्रभाकर मुळे, विजय शिंगाडे, शांताराम पेंदे तसेच सर्व वॉरियर्स उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी भाजपचे तालुकाध्यक्ष  संतोष (दादा) बोबडे यांनी आभार मानले.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा.....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236

Post a Comment

0 Comments