Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयात क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन साजरा

येणेगुर/ योगेश पांचाळ 
 उमरगा तालुक्यातील येणेगूर येथील कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयात( ता.3)वार बुधवार रोजी भारतातील पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका स्री शिक्षणाच्या प्रणेत्या विद्येची जननी व समस्त स्रियांना उजेडाची वाट दाखवणार्‍या क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन साजरा करण्यात आला.

क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक महेश हरके ,संचालक आनंदराज बिराजदार,अविनाश दुनगे, शिक्षिका कोमल किर्तने, पार्वती जगताप, सुप्रिया शिंगाडे,आम्रपाली गायकवाड, यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कोमल किर्तने मॅडम यांनी क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच सौंदर्या येडगे, गायत्री भैरप्पा महेरून शेख,गौरी स्वामी, प्रतिक्षा गायकवाड, समर्थ बिराजदार,फयाज मकानदार,मनीष हांडे,अर्पिता मामाने, सलमा तांबोळी,साधना परीट,अनिशा चव्हाण,संध्या कवठे,मयुरी कवठे,विद्यार्थांनी मनोगत व्यक्त केले.

 कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक  सांस्कृतिक विभागप्रमुख गोपाळ गेडाम यांनी केले.या कार्यक्रमासाठी शिक्षक महेश खंडाळकर,प्रवीण स्वामी, प्रा सुरेश जाधव, प्रा महादेव बिराजदार,गणेश जोजन,प्रदीप शिंदे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236

Post a Comment

0 Comments