काटी:- तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील रामचंद्र हरिश्चंद्र माने वय 60 यांचे मंगळवार दिनांक 2 रोजी पहाटे 3 वाजता सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. ते मुंबई येथे बेस्ट मध्ये डेपो मॅनेजर पदावरुन तीन वर्षांपुर्वीच सेवा निवृत्त होऊन तुळजापूर तालुक्यातील सावरगाव या त्यांच्या मुळ गावी येऊन शेतीकडे लक्ष देत होते.
त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी 11:45 वाजता येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, एक भाऊ, भावजय असा परिवार आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments