Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील भिमनगरमध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिन उत्साहात साजरा; भीम अनुयायांकडून मानवंदना

काटी/ उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील भिमनगरमध्ये भीमा  कोरेगाव शौर्य दिनानिमित्त सोमवार  दि.1 रोजी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन दलित मित्र नंदु बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

सोमवारी सायंकाळी ग्रामपंचायत सदस्य अनिल बनसोडे व सामाजिक कार्यकर्ते भोलेनाथ बनसोडे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून अभिवादन व मानवंदना  देण्यात आली. त्यानंतर भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त डॉल्बीच्या व भिम गीतांच्या तालावर भीमा कोरेगाव येथील क्रांतीवीरांचा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात मोठ्या जल्लोषपुर्ण वातावरणात भीमा कोरेगाव शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी धनराज  बनसोडे यांनी रांगोळीतून भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाची आकर्षक प्रतिकृती साकारली होती.

यावेळी दलित मित्र नंदु बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते भोलेनाथ बनसोडे, दशरथ बनसोडे, वंदेश बनसोडे, भैरीनाथ साबळे, भागवत घोंगडे, सचिन बनसोडे, धनराज बनसोडे, अंकित बनसोडे, आकाश चव्हाण, दिनेश डोळसे, मंगेश बनसोडे, अनुसया बनसोडे, ताई सुरते, सोजरबाई बनसोडे, भीमा घोंगडे, सुजल बनसोडे यांच्यासह भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा.....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments