Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन साजरा

                           
येणेगर/प्रतिनिधी
 उमरगा तालुक्यातील येणेगूर येथील कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयतील १० वी च्या विद्यार्थांचा स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी स्वयं जबाबदारीची जाणीव  व्हावी यासाठी  स्वयंशासन दिन साजरा केला जातो. प्रत्येक विद्यार्थ्याने वेगवेगळ्या वेशभूषामध्ये मने आकर्षण करून घेतली.तर प्रत्येकाने आपली कामे जबाबदारीने पूर्ण केली. त्यांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत असलेला दिसला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री परमहंस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवराज बिराजदार  प्रशालेचे मुख्याध्यापक महेश हरके,स्वीय सहाय्यक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे स्वीय सहाय्यक नितीन चव्हाण,महाराष्ट्र पोलीस सचिन बनसोडे यांच्या उपस्थितीत स्वयंशासन दिनाची सांगता मोठे उत्साहात पार पडला.स्वयंशासन दिनाच्या मुख्याध्यापिका कु.पाटील धानेश्वरी संभाजी व पर्यवेक्षिका कु.सोनकटाळे श्रद्धा विजयानंद यांनी काम पाहिले. विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये आजच्या दिवशी आनंदाचे वातावरण होते.  या स्वयं शासन दिनानिमित्त श्री परमहंस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवराज बिराजदार,यांनी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले. स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापिका कु.पाटील धानेश्वरी संभाजीराव,पर्यवेक्षिका कु. सोनकटाळे श्रद्धा विजयानंद,तसेच शिक्षक झालेले कुमारी संमती पोतदार, राजकन्या बनसोडे, समर्थ बिराजदार,रिया कांबळे,निकत मुल्ला,गायत्री स्वामी,गायत्री भैरप्पा,मेहरुन शेख,विद्यार्थांनी मनोगत व्यक्त केले,स्वयंशासन दिनात एकुण ३०विद्यार्थां शिक्षक  व ४ विद्यार्थां सेवक सहभाग घेतला होता १० विच्या विद्यार्थांना वर्ग शिक्षक शंकर हुळमजगे व महेश खंडाळकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक कु.आरती बारडोळे, कु.समृद्धी पाटील व सांस्कृतिक विभागप्रमुख गोपाळ गेडाम यांनी आभार मानले .या कार्यक्रमासाठी शिक्षक आनंदराज बिराजदार,व्यंकट बिराजदार,चंद्रकांत बिराजदार,सौरभ उटगे,प्रवीण स्वामी,अविनाश दुनगे, पार्वती जगताप,कालिंदी भाले,प्रा सुरेश जाधव,प्रा महादेव बिराजदार,कोमल कीर्तने,गणेश जोजन,अप्पू मुदकण्णा प्रदीप शिंदे,व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236

Post a Comment

0 Comments