Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील शुभांगी नाबाजी ढगे यांना शासनामार्फत दिला जाणारा राजमाता कृषीभूषण पुरस्कार जाहीर

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी  येथील शुभांगी ढगे यांना शासनामार्फत  दिला जाणारा जिजामाता कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

राज्यात कृषी व संलग्न फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य  करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत दिला जाणारा 2020 च्या पुरस्काराची घोषणा शासनाने विभाग स्तरावरुन केली असून शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्कारात तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार नाबाजी गोरख ढगे यांच्या पत्नी शुभांगी नाबाजी ढगे   यांना लातूर विभागातून राजमाता  कृषी भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मानेगाव (थोरले) ता. माढा येथे शुभांगी ढगे यांचे वडिल मोहन  सौदागर राऊत यांचेकडे 25 एकर द्राक्ष बाग असल्याने आपल्या वडिलांचा वारसा त्या आपल्या पतीकडेही व्यवस्थितपणे सांभाळत आहेत.

रासायनिक औषधांचा वापर आढळ्यास युरोप खंडात द्राक्ष निर्यात होत नाहीत. त्या पार्श्वभूमीवर प्रगतशील द्राक्ष बागायतदार नाबाजी ढगे व त्यांच्या पत्नी शुभांगी ढगे यांनी बऱ्याच दिवसांपासून आपल्या शेतात सेंद्रिय शेती व्यवस्थापनाचा जास्तीत जास्त वापर करतात. 50 टक्के प्रत्येकी रासायनिक व सेंद्रिय व्यवस्थापनाद्वारे उत्पादन साधून 9 पैकी 7.5 एकरावरील संपुर्ण द्राक्ष युरोपात निर्यात करण्यात यशस्वी  झाले आहेत. 7.5 एकर द्राक्ष व अन्य क्षेत्रात दिड एकर कांदा, भाजीपाला असे उत्पादन घेतले जाते. सेंद्रिय पद्धतीवर अधिक भर देत रासायनिक खतांचा वापर फक्त  कीडनाशकां पुरता वापर करतात. त्यामुळे त्यांच्या क्लोन 2 या व्हरायटीला युरोपात मागणी असून दरवर्षी त्यांची युरोप मध्ये एक्सपोर्ट होत आहेत. त्यांच्या द्राक्ष बागेतून 12 ते 15 टनांपर्यंत उत्पादन होत असून त्यांना 80 ते 90 रुपये प्रति किलो भाव मिळत आहे.

त्यांचेकडे 40 टनाचे बेदाणा शेड असल्याने उर्वरित द्राक्षांचे उत्तमरित्या बेदाणा करतात. या त्यांच्या द्राक्ष बागेमुळे 20 ते 25 मजुरांना वर्षेभर रोजगार उपलब्ध झाला आहे. या कामात शेतकरी नाबाजी ढगे व त्यांच्या पत्नी शुभांगी ढगे या स्वतः शेतामध्ये काम करत असतात. प्रामुख्याने शुभांगी या स्वतः ट्रॅक्टर चालवत द्राक्ष बागेत फवारणी, छाटणी, पेस्ट लावणे, नवीन मशिनद्वारे बागेत स्प्रे करणे आदी बागेतील कामे त्या स्वतः च करतात. त्याचप्रमाणे दुग्ध व्यवसाय सांभाळून गोठा व्यवस्थापन करतात. 12 बोअरवेल व 2 विहिरी मधून पाणी पुरवठा होत असला तरी मागील वर्षी पाऊस न झाल्याने अशा संकटांच्या  व अवर्षण काळातही पाण्याचे योग्य व्यवस्थापन करीत आहेत. यासाठी त्यांना निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी त्यांच्या जळकोट येथील मैत्रिण रेखा बाबासाहेब पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

एक प्रयोगशील शेतकरी व कृषी कन्या शुभांगी नाबाजी ढगे यांना मिळालेल्या शासनाच्या  कृषी विभागामार्फत जिजामाता  कृषिभूषण पुरस्काराबद्दल काटीसह परिसरातून सर्वत्र कौतुक होत असून लवकरच कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुणे येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments