येणेगूर/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील आनंद मंगल कार्यालय महादेव मंदिर उमरगा येथे गुरुवार दि.22 रोजी भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
विश्वकर्मा जयंती हा दिवस भगवान विश्वकर्मा यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. अभियंते, कारागीर, कामगार, औद्योगिक कामगार, सुतार, वास्तुविशारद आणि शिल्पकार यांच्यासाठीही या दिवसाचे खूप महत्त्व आहे. या उत्सवात महिला, पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन भजन गायन केले.
प्रारंभी श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विराट विश्वकर्मा संघ जिल्हाध्यक्ष परमेश्वर पांचाळ, कार्यक्रमाचे उद्घाटक काँग्रेस कमिटी शहर उमरगा अनिल सगर, महिला समाज मार्गदर्शक उमरगा संगीता पांचाळ,महिला समाज मार्गदर्शक कदेर लक्ष्मीताई पांचाळ, प्रमुख पाहुणे सहशिक्षक बालाजी पांचाळ, प्रा.चंद्रकांत पांचाळ,पत्रकार महादेव पांचाळ,दिलीप पांचाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अनिल सगर, चंद्रकांत पांचाळ यांनी आपल्या मनोगतात समाज संघटित होणे काळाची गरज असल्याचे सांगून सुतार समाजाने संघटीत व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वकर्मा संघ धाराशिव जिल्हा धनराज पांचाळ, जिल्हा सचिव संदीप पांचाळ,तालुका सदस्य चंद्रकांत सुतार, उमरगा तालुका उपाध्यक्ष मारुती पांचाळ, कृष्णा सुतार,भरत पांचाळ,चेतन पांचाळ,जयंती समिती अध्यक्ष अंबादास पांचाळ, ज्ञानेश्वर पांचाळ, गणपती पांचाळ,भीमाशंकर पांचाळ,गोविंद पांचाळ, स्वप्निल पांचाळ,अमोल पांचाळ यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पांचाळ तर आभार चंद्रकांत सुतार यांनी मानले.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236
0 Comments