Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटीमध्ये श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त तीन दिवसीय पारायण सोहळ्यासह विविध कार्यक्रम धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे भैरवनाथ  मंदिराजवळील सुहास कुलकर्णी यांच्या निवासस्थानी गुरुवार दि.29 फेब्रुवारी ते रविवार दि. 3 मार्च या कालावधीत श्री गजानन महाराज यांच्या 146 व्या प्रगट दिनानिमित्त तीन दिवसीय पारायण सोहळ्यासह 
विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
काटी येथील भैरवनाथ मंदिराजवळील  सुहास उर्फ पिंटू कुलकर्णी यांच्या निवासस्थानी गुरुवार दि.29 फेब्रुवारी ते 3 मार्च या दरम्यान सकाळी 8 ते 10:30 या कालावधीत श्री गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायणासह हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. 
गुरुवार दि.29 रोजी सकाळी 9 वाजता वाजता श्री गजानन विजय ग्रंथाचे पूजन,कलश पूजन व सद्गुरू  श्री गजानन महाराज प्रतिमेची स्थापना होणार आहे. दररोज सकाळी 10:30 चहा, नाष्टा व दुपारी 12:30 वाजता आरती होणार आहे. शुक्रवार दि.1 रोजी सकाळी 8 वाजता श्री गजानन विजय ग्रंथातील पहिल्या अध्यायाचे सामुदायिक वाचन होणार आहे.

यासाठी आयोजकांच्या वतीने दहा अंक उपलब्ध करण्यात आले असून उर्वरित भक्तांनी ग्रंथ,चौरंग स्वतःच्या  घरुन आणावयाचे आहेत असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. रात्री 9 वाजता येथील समर्थ महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
शनिवार सकाळी पारायण, आरतीनंतर रात्री 9 वाजता गायण  सम्राट हभप सुनील महाराज ढगे यांच्या हरि किर्तन सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे. तर रविवार दि. 3 मार्च रोजी सकाळी ग्रंथ वाचन राहिलेल्या भक्तांसाठी पारायण, 9 ते 12 या कालावधीत काटी व सारोळा येथील भजनी मंडळाच्या वतीने सामुदायिक भजन गायन, जप व दुपारी 12:30 वाजता महाआरती नंतर महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होणार आहे.

या तीन दिवसीय श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त घेण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे, आवाहन आयोजकांच्या वतीने सुहास उर्फ पिंटू कुलकर्णी व हभप सुनिल ढगे महाराज यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments