Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

संत गाडगे महाराज यांची १४८ वी जयंती व्याख्यानाने माधवराव पाटील महाविद्यालयात साजरी

             
मुरूम/प्रतिनिधी 
 उमरगा तालुक्यातील मुरुम येथे संत गाडगे महाराज यांची १४८ वी जयंती राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने श्री माधवराव पाटील महाविद्यालयात शुक्रवारी (ता.२३) रोजी साजरी करण्यात आली. प्रारंभी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. सायबण्णा घोडके, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. महेश मोटे, डॉ. सुभाष हुलपल्ले, डॉ. मुकूंद धुळेकर, डॉ. नरसिंग कदम, डॉ. अरुण बावा, डॉ. रमेश आडे, प्रा. राजकुमार रोहीकर,  डॉ. महादेव कलशेट्टी, डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ. रविंद्र आळंगे, डॉ. अरविंद बिराजदार, प्रा. गोपाळ कुलकर्णी, प्रा. नाना बेंडकाळे, राजू ढगे, सुरेखा पाटील, दत्तु गडवे, आनंद वाघमोडे, राजानंद स्वामी,  लालअहमद जेवळे, श्रावण कोकणे, इसाली चाऊस आदींसह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी, डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी संत गाडगे महाराज : व्यक्ति आणि विचार या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगत प्रा. अशोक बावगे यांनी केले. सूत्रसंचलन डॉ. अविनाश मुळे तर आभार डॉ. राजू शेख यांनी मानले.                         
 मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना अशोक सपाटे, चंद्रकांत बिराजदार, प्रतापसिंग राजपूत, अशोक बावगे, नरसिंग कदम आदी.

Post a Comment

0 Comments