Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

शिवजयंती निमित्त शिवप्रेमी प्रतिष्ठानकडून विविध उपक्रम संपन्न


मुरूम/प्रतिनिधी 
उमरगा तालुक्यातील मुरुम येथील शिवप्रेमी प्रतिष्ठानकडून शिवजयंती उत्सव विविध सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरुवारी (ता. २२) रोजी साजरी करण्यात आली.  प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा सेनेचे तालुका प्रमुख अजित चौधरी यांच्या पुढाकाराने गोरगरीब गरजू महिलांना ११ शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबीर घेण्यात आले. 

शहरातील रत्नमाला मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रम प्रसंगी उध्दव ठाकरे सेनेचे नेते धाराशिवचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, स्वप्नील कुनजीर, बाबा पाटील, रणधीर पवार, बाबुराव शहापुरे, रजाक अत्तार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

नेत्र तपासणी शिबिरात ३५० रुग्णांची तपासणी करून ३०० रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. ६१ रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी घेतला. रक्तदात्यांना प्रतिष्ठानकडून भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमासाठी दत्ता हुळमजगे, विशाल मोहिते, जयसिंह खंडागळे, प्रवीण बिराजदार, महेश हिंडोळे, महादेव शिंदे, नागेश मुदकणा, विशाल चौधरी, आरिफ कुरेशी, शंकर इंगळे, संजय आलंगे, दादा बेंडकाळे, विठ्ठल चौधरी, प्रवीण चौधरी, राघवेंद्र चौधरी, संतोष बिराजदार, दत्ता चौधरी, सुमित पांढरे, रवी देसाटे आदींनी पुढाकार घेतला होता.                          


मुरूम, ता. उमरगा येथील शिवप्रेमी प्रतिष्ठानकडून गोरगरीब महिलांना शिलाई मशीनचे वाटप करताना मान्यवरांसोबत शिवप्रेमी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी

Post a Comment

0 Comments