Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

गंजेवाडीतील प्रगतशील द्राक्ष बागायतदार सुदर्शन जाधव यांना शासनामार्फत दिला जाणारा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी येथील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी सुदर्शन शिवाजी जाधव यांना राज्यात कृषी व संलग्न फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य  करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत दिला जाणारा 2020 च्या पुरस्काराची घोषणा शासनाने विभाग स्तरावरुन केली असून शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्कारात तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार सुदर्शन शिवाजी जाधव यांना सर्वसाधारण गटातून वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाला आहे. 

सुदर्शन जाधव हे साडेतेरा एकर निर्यातक्षम द्राक्ष बाग सांभाळत असून बांधावर 350 हापूस आंबे लावले आहेत. त्यातील 100 झाडांना फळे आली आहेत. सुदर्शन जाधव हे आपल्या शेतीत रासायनिक खतांचा कमी वापर करून सेंद्रिय खतांचा जास्त वापर करीत शेतामध्ये विविध प्रयोग करीत विक्रमी उत्पन्न घेतात.

त्यांना मिळालेल्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक होत असून लवकरच कृषी विभागामार्फत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments