काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील वाणेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी पंडित बामणकर तर उपाध्यक्षपदी सौ.दिपाली काटकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक राहुल गवळी यांच्या अध्यक्षतेखाली 2024-25 या शैक्षणिक वर्षातील पहिली पालक सभा आयोजित करण्यात आली. या सभेत विविध समित्या गठित करण्यात आल्या.
यावेळी 2024-25 ते 2025-26 या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी बामणकर तर उपाध्यक्षपदी दिपाली काटकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत सौ.चंदाराणी मिरजे, प्रवीण पाटील, धनंजय वळशिंगे, प्रेमनाथ गाढवे,रोहिणी बामणकर,सौ.सविता नकाते, हर्षवर्धन बामनकर, सौ.सविता शिनगारे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी वाणेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा, माता-पालक व ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचे अभिनंदन करुन सत्कार करण्यात आला.
यावेळी नूतन अध्यक्ष पंडित बामणकर यांनी सर्वांच्या सहकार्याने शाळेच्या विकासासाठी आदर्शवत काम करण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रास्ताविक व आभार शाळेचे मुख्याध्यापक राहुल गवळी यांनी मानले.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments