काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी), वाणेवाडी, काटी तांडा, खुंटेवाडी, दहिवडी, केमवाडी आदी गावांमध्ये शनिवार दि. 27 रोजी महाविकास आघाडीतील कॉंग्रेसचे जेष्ठ नेते तथा कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी उस्मानाबाद -धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दौरा करून नागरिकांशी संवाद साधून महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटाचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी महाविकास आघाडीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील आठवडाभरापासून कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आप्पासाहेब पाटील हे उस्मानाबाद -धाराशिव लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ तालुक्यात फिरत असून ओमराजे निंबाळकर यांना निवडून देण्यासाठी मतदारांना आवाहन करीत आहेत.
या दौऱ्यात दरम्यान त्यांनी सध्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीची स्थिती भक्कम असून लोकसभेत महाविकास आघाडीच सत्तेत येणार असल्याचा विश्वास उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. तसेच मी विद्यार्थी दशेपासून 1957 पासून कॉंग्रेसचे कार्य करीत असताना तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना, कुलस्वामिनी सुतमील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विधानसभा ताब्यात घेण्यासाठी मागील 50 वर्षात संघर्ष केला असल्याचे सांगून कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या तुळजापूर तालुक्यात फोडाफोडीच्या राजकारणामुळे सध्या कॉंग्रेस पक्षाची पिछेहाट झाली असली तरी कोणी कोणत्याही पक्षात गेले असले तरी आगामी काळात आपण पक्षवाढीसाठी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी व 2019 मध्ये कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले. महाविकास आघाडी बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा गटाचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित मतदारांना केले.
यावेळी महाविकास आघाडीतील कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क संपर्क करा...
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments