Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

यमगरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक एम.एच. शेख यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार


काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षक एम.एच. शेख यांचा सोमवार  दि.29 रोजी सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोहळा संपन्न झाला. 

सोमवारी यमगरवाडी  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक शेख एम.एच. हे नियत वयोमानानुसार 30 एप्रिल 2024 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने शाळेच्या व पालकांच्या वतीने  शेख एम.एच. यांचा शाल, श्रीफळ  व पुष्पहार घालून यथोचित सत्कार करुन  पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

यावेळी नांदुरी केंद्राचे केंद्रप्रमुख भिसे,केंद्रीय मुख्याध्यापक दुधंबे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक वडने, मस्के सर ,जेटीथोर सर तसेच केंद्रांतर्गत शिक्षक व पालक, विद्यार्थी उपस्थित होते. 
याप्रसंगी कार्यक्रमात श्री शेख एम.एच. यांच्या कार्यकाळातील  आठवणींना उजाळा देत त्यांच्या विषयी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमात व्यक्त होताना श्री शेख एम एच यांनी शैक्षणिक प्रवासाचा अनुभव मांडला. कार्यक्रमात शेवटी श्री घोडके डी.टी यांनी  उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा.....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments