Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामलवाडी पोलीस स्टेशन अलर्ट मोडवर; तामलवाडी, सावरगाव, काटी मसला (खुर्द ), माळुंब्रा, सांगवी (काटी) गावात पथसंचलन

काटी/उमाजी गायकवाड
लोकसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस स्टेशन अलर्ट मोडवर आले असून   सोमवार  दि. 29 रोजी तामलवाडी  पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांच्या नेतृत्वाखाली तामलवाडी पोलीसांच्या वतीने तामलवाडी पोलीस ठाणे हद्दीतील तामलवाडीसह, सावरगाव, काटी मसला (खुर्द ), माळुंब्रा, सांगवी (काटी) या  गावातील प्रमुख मार्गावरून सोमवारी  पथसंचलन करण्यात आले. मतदार संघात निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासह बंदोबस्तासाठी  पोलीसांनी गावातील  प्रमुख गावच्या मार्गावरून पथसंचलन करण्यात आले.

निवडणूक काळात शांतता बिघडू नये यासाठी ही पोलीस  यंत्रणा नियंत्रण ठेवणार असल्याचे सांगून सध्या असणारे पोलीस कर्मचारी विविध ठिकाणी  तैनात करण्यात आल्याचे तामलवाडी  पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार  यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments