Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

रुक्मिणी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष कै सूर्यभान हंगरकर यांची पुण्यतिथी सामाजिक उपक्रमांनी साजरी

काटी :- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रुक्मिणी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष कै सूर्यभान(दादा)लक्ष्मण हंगरकर यांची पुण्यतिथी बुधवार दि 8 रोजी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरी करण्यात आली.मान्यवर व नातेवाईकांचे हस्ते सकाळी प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.अनिल हंगरकर यांच्यावतीने अन्नदान करण्यात आले.तसेच सहारा वृध्दाश्रम गौडगाव ता.बार्शी येथे रुक्मिणी फाऊंडेशन चे सचिव प्रा अभिमान हंगरकर यांच्या वतीने संस्थापक संचालक राहूल भड यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले.

या शिवाय धाराशिव येथील अन्नपूर्णा सामाजिक संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या अन्नछत्रात रुग्णांच्या नातेवाईकांना प्रा अभिमान हंगरकर यांच्यावतीने अतुल अजमेरा व त्यांच्या सहकार्यातून अन्नदान करण्यात आले.काटी येथे रात्री भजनी मंडळाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी अनिल हंगरकर,कस्तुरबाई हंगरकर,सुजित हंगरगेकर,राजेंद्र गाटे,बाळासाहेब शिंदे,सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन चे संचालक शिवाजीराव चव्हाण, स्वप्नाली चव्हाण,अरुण शितोळे,अमोल शितोळे, अखिल शितोळे,आबा गाटे,आण्णा गाटे,अक्षय शिंदे,अभिजित शिंदे,मनिषा हंगरकर,स्वरा हंगरकर आदींसह सर्व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments