काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटीसह परिसरात मृग नक्षत्राच्या सलग तिसऱ्या दिवशी रविवार दि.9 सायंकाळी 6 वाजता विजेचा प्रचंड कडकडाटसह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
काटीसह परिसरात रविवारी सायंकाळी 6 वाजता विजेच्या कडकडाटसह वरुणराजाने जोरदार हजेरी लावली. काटीसह परिसरातील गावात शुक्रवार शनिवारी पावसाने हजेरी लावली होती. शनिवारी मृग नक्षत्र सुरू झाले. शनिवार व रविवार असे दोन दिवस मृग नक्षत्रातील पावसाने काटी व परिसरातील गावात पावसाने हजेरी लावली. यामुळे बळीराजा सुखावला आहे.
पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची खरीप पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे काही शेतकऱ्यांनी रासायनिक खते बियाणे खरेदी करून ठेवली आहेत तर काही शेतकरी खते बियाणे खरेदीसाठी पैशाची जुळवाजुळव करत असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments