Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

नवोदय विद्यालयात 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा

तुळजापूर/प्रतिनिधी
तुळजापूर येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात गुरुवार दि. 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी सर्वप्रथम श्री हरी जाधव यांनी संपूर्ण जगामध्ये 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यापाठीमागचा उद्देश स्पष्ट करून सांगितला. त्यानंतर कु. मंजिरी मुसांडे व मा. वैजनाथ बोडके या विद्यार्थ्यांनी लोकसंख्येच्या वाढीचे दुष्परिणाम समाजावरती कसे होत आहेत यावरती आपले विचार प्रकट केले. डॉ. किशोर चौधरी यांनी वाढती लोकसंख्या घटविण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रयत्न केले पाहिजेत यावरती आपले विचार व्यक्त केले

भारत देश जगात लोक संख्येने आघाडीवर
               --प्राचार्य चंद्रमणी गोमारे
विद्यालयाचे  प्रभारी प्राचार्य श्री चक्रपाणि गोमारे यांनी भारत देश सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे .2022 मध्ये लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकून सध्या लोकसंख्येच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आलेला आहे हे सांगून ही लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर नैसर्गिक साधन संपत्तीवर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. यासाठी लोकसंख्या घटली पाहिजे व निर्माण होणारी लोकसंख्या गुणवत्तापूर्ण झाली पाहिजे. यासाठी सर्वांनी विचार मंथन करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी समाजशास्त्र विभागातर्फे घोषवाक्य स्पर्धा सहावी ते आठवी या वर्गासाठी घेण्यात आल्या . यामध्ये 43 मुला मुलींनी भाग घेतला होता. प्रथम क्रमांक: वैभव जगताप ,द्वितीय क्रमांक : सर्वज्ञ गोमारे या विद्यार्थ्यांनी मिळवला. या स्पर्धा घेण्यासाठी समाजशास्त्र विभाग प्रमुख श्री  चक्रपाणि गोमारे व डॉ. किशोर चौधरी यांनी विशेष पुढाकार घेतला होता. 

याप्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रम प्रभारी श्री. हरी जाधव यांनी केले.

                          उपस्थित मान्यवर.........


Post a Comment

0 Comments