Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

औषध निर्मितीच्या क्षेत्रात भारतीय तरुणांचा मोठा वाटा--- प्राचार्य डॉ. श्रीराम पेठकर

मुरूम/प्रतिनिधी 
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून गुणात्मक व दर्जात्मक शिक्षण घेण्याची नाविन्यपूर्ण संधी डी व बी फार्मसीच्या माध्यमातून आहे. तेव्हा युवकांनी औषध निर्मितीच्या क्षेत्रात मानवी आरोग्याकरिता दर्जेदार औषधे निर्माण करावीत. कोविडच्या काळात औषधी निर्मितीच्या क्षेत्रात भारतीय युवकांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन श्रमजीवी फार्मसी उमरगाचे प्राचार्य डॉ. श्रीराम पेठकर यांनी केले. मुरूम येथील माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पालक मेळावा बुधवारी (ता. १०) रोजी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील होते. यावेळी माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, माजी उपसभापती गोविंद पाटील, महालिंगप्पा बाबशेट्टी, प्रा. डॉ. सतिश शेळके, उपप्राचार्य योगेश पाटील, पत्रकार अविनाश काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते माधवराव (काका) पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी दैनिक सकाळचा विभागीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल उमरगा तालुका बातमीदार अविनाश काळे यांचा फेटा, शाल व पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डी व बी फार्मसीच्या  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रतिक्षा गायकवाड, पुजा ख्याडे, दीक्षा डावरे, अंकिता सुरतबन्सी, श्रीषा मुरुमकर, आदिती सुरवसे, तुषार राजमाने, रुबीना शेख, संग्राम आसबे, अनुष्का पोतदार, सवेरा पटेल, पुजा पाटील, शांभवी दामा, प्रिती येवले, ओंकार राजमाने, आकांक्षा इंगळे, सुरज साठे, प्रियंका पवार, सुप्रिया बावा आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सतिश शेळके, पालक संजयकुमार मुरूमकर, श्रीशा मुरूमकर, अंकिता सुरजबन्सी, प्रतिक्षा गायकवाड, पुजा पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना डॉ. पेठकर म्हणाले की, संस्थेने या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या भौतिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचा फायदा या भागातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रविंद्र आळंगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. प्रियंका काजळे यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते.             

मुरूम, ता. उमरगा माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी बापूराव पाटील, श्रीराम पेठकर, अशोक सपाटे, गोविंद पाटील, रवि आळंगे व अन्य.

Post a Comment

0 Comments