येणेगूर/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील जेकेकुर येथील रहिवाशी तथा भारत-पाकिस्तानच्या 1971 च्या युद्धातील जकेकूर येथील माजी सैनिक चंद्रकांत बिराजदार वय (83) वर्षे यांचे गुरुवार ता.11रोजी दुपारी पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
जकेकूरचे माझी सैनिक बिराजदार यांनी भारत-पाकिस्तान युद्धात मोलाचे योगदान दिले होते. विजय पर्व 2021च्या निमित्ताने भारत-पाकिस्तान युद्धात सहभागी होते.यामध्ये उमरगा तालुक्यातील जकेकूर येथील सुपुत्र माजी सैनिक चंद्रकांत बिराजदार याचा तत्कालीन सेना प्रमुख मनोज नरवणे यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात गौरव करण्यात आला होता.
त्यांच्या पच्श्रात पत्नी,दोन मुले,दोन मुली,सुना,नातवंडे असा हा परिवार आहे.जकेकूरचे सरपंच अनिल बिराजदार यांचे वडील होते.
0 Comments