Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

भाविकांना महाद्वारातूनच प्रवेश मिळणार; तुळजापूर मंदिर विकास आराखड्याबाबत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नागरिकांना विश्वासात घेऊन विकास कामे करणार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली भूमिका स्पष्ट; महिला शौचालयासाठी माजी नगरसेवक विनोद गंगणे यांनी दिली स्वतः ची जागा

तुळजापूर:-तुळजापूर येथील माजी नगरसेवक श्री.विनोद गंगणे यांनी स्वतःची मालकीची जागा महिलांसाठीच्या शौचालयासाठी दिली आहे. त्यांनी स्वतःची जागा देऊन शहराच्या विकासास सुरुवात केली आहे. श्री.विनोद गंगणे यांच्या प्रमाणे इतरही नागरिकांनी विकास कामासाठी स्वतःहून पुढे येऊन आपली जागा द्यावी, असे आवाहन यावेळी आ . राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.

प्रशाद योजने अंतर्गत तुळजापूर मंदिर परिसर विकास आराखड्यात भाविकांना महाद्वारातून प्रवेश मिळणार असून स्थानिक व्यापारी, पुजारी व नागरिकांच्या सूचनेनुसारच काम केले जाणार आहे. मात्र विकासाच्या कामात काही लोक राजकारण करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आराधवाडी येथे विकासकामे करण्यात येणार असल्याची अफवा पसरवत आहेत. परंतु आराधवाडी येथे कोणतेही विकासकाम करण्यात येणार नसून तेथील नागरिकांचीही तशी मागणी आहे. तेथे फक्त १२ मीटरचा रस्ता करण्यात येणार आहे. २०० एकर मध्ये भक्तांना राहण्यासाठी निवासस्थाने तसेच पुजारी यांच्यासाठी देखील घरे बांधण्यात येणार आहे. या कामासाठी दोन-तीन ठिकाणच्या जागेची पाहणी करण्यात येणार असून तुळजापुरात दररोज १ लाख भाविकांचे नियोजन करण्यात येणार आहे.

शहरात विकासकामे करताना सर्वानुमते निर्णय घेण्यात येणार आहेत. यासाठी सर्वांनी विकास आराखडा व्यवस्थित पहावा व त्यावर काही सूचना असतील तर त्या लेखी स्वरुपात मांडाव्यात. पहिल्या टप्प्यात मंदिराच्या आतील कामे करण्यात येणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे काहीजण जाणून-बुजून विरोध करत असतील तर त्यांचा विचार केला जाणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

यावेळी श्री.सचिन रोचकरी, श्री.विनोद गंगणे, श्री.अविनाश गंगणे, श्री.किशोर गंगणे, श्री.शांताराम पेंदे, श्री.नरेश अमृतराव, श्री.शिवाजी बोधले, श्री.सुहास साळुंखे, श्री.निलेश रोचकरी, श्री.आनंद कंदले, श्री.बाळासाहेब भोसले, श्री.इंद्रजीत साळुंखे, श्री.समर्थ पैलवान, श्री.रोहित चव्हाण,  पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments