Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

एनडीए सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे लबाडा औतान--शिवसेना (उबाठा) प्रवक्त्या अस्मिता गायकवाड

सोलापूर:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा अर्थसंकल्प अखेर  23 जुलै रोजी आर्थिक वर्ष 2024-25 साठीचा देशाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामण यांनी सादर केला.

या सादर केलेल्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाविषयी प्रतिक्रिया देताना शिवसेना उबाठा गटाच्या प्रवक्त्या सौ. अस्मिता सुरेश गायकवाड यांनी तिखट प्रतिक्रिया दिली असून केंद्र सरकारने सादर केलेले बजेट हे लबाडाचे औतान असल्याचे  सांगून या बजेटमध्ये विशेषतः महाराष्ट्राला पूर्णपणे दुर्लक्षित ठेवण्यात आल्याचे  म्हटले आहे. 

सत्तेच्या लाचारीपोटी बिहार व आंध्र प्रदेशाकरिता विशेष झुकते माप देऊन देशाच्या संतुलित विकासामध्ये पक्षपाती पणा केल्याचे  सांगून महाराष्ट्रातुन करोडो रुपये कराच्या माध्यमातून वसूल करून आत्तापर्यंत केंद्रांतील मोदी सरकारने महाराष्ट्र लुटण्याचे काम केल्याचेही  त्यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रातील भाजप मित्र पक्षांच्या आठ खासदारांना तर कोठेही खीजगिनतीत सुद्धा घेतले नसल्याचा आरोप  करीत महाराष्ट्राला सापत्न वागणूक मोदी सरकार किती दिवस देणार आणि महाराष्ट्र हे किती दिवस सहन करणार? असा सवालही  त्यांनी  उपस्थित केला आहे. पुढे  त्या म्हणाल्या महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणतीही विशेष तरतूद न करता वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत,केंद्रीय बजेट मधील तरतुदी अत्यंत तकलादू असून, त्या फसव्या आहेत व लोकांची दिशाभूल करणाऱ्या आहेत, महिलांसाठी बेरोजगारांसाठी त्यात भरीव अशा कुठल्याही योजना तरतुदी या अर्थसंकल्पात नाहीत. अत्यंत निराशा जनक हा अर्थसंकल्प आहे.
   ---शिवसेना (उबाठा )प्रवक्त्या सौ.अस्मिता  गायकवाड

Post a Comment

0 Comments