मुरुम/प्रतिनिधी
बालपणापासूनच अण्णाभाऊंच्या वाट्याला हलाखीचे जगणं आले. केवळ अण्णाभाऊंना दीड दिवस शाळेचा सहवास लाभला. अण्णाभाऊंनी मराठीत ३५ कांदबऱ्या व २१ कथासंग्रह लिहिले. मराठी साहित्यातील लोकनाट्य, पोवाडे, लावणी, प्रवास वर्णने, कथा, कविता, गीते आदी क्षेत्रात त्यांनी समृद्ध लेखन केले. यामुळेच साहित्यातील सात्विकता जपण्याचे काम अण्णाभाऊंचे असे प्रतिपादन माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केले. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील जयंती उत्सव समितीच्या वतीने साठे चौकात गुरुवारी (ता. २२) रोजी व्याख्यानाप्रसंगी व्याख्याते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बसवराज पाटील होते. यावेळी बहुजन रयत परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर, प्रदेश उपाध्यक्ष बालाजी गायकवाड, माजी नगराध्यक्ष रशिद शेख, श्रीकांत बेंडकाळे, स्वागताध्यक्ष माजी नगराध्यक्ष बबन बनसोडे, नगरसेविका सुमन देडे, शरद अडागळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना ढोबळे म्हणाले की, माझी मैना गावाकडे राहिली व मुंबईची लावणी या त्यांच्या लावण्या गाजल्या. याशिवाय सद्यस्थितीत समाजाने निर्व्यसनी राहणे गरजेचे आहे. ज्यामुळे कुटुंबाची प्रगती होते अन्यथा आपली वाटचाल अधोगतीकडेच राहील, हे लक्षात ठेवा.
अध्यक्ष समारोपात बसवराज पाटील म्हणाले की, समाजाने अण्णाभाऊंच्या विचारांची कास धरून जगले पाहिजे. अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या माध्यमातून येथील जनतेने जास्तीत-जास्त लाभ करून घ्यावा, असे आव्हान यावेळी त्यांनी केले. यावेळी लखन देडे, बंडू कांबळे, राजेंद्र देडे, पंकज बनसोडे, अमित देडे, किरण देडे, तुळशीराम देडे, रघुनाथ बनसोडे, विनायक देडे, शंकर पाटोळे, खंडू देडे, सचिन जाधव, जुगनू देडे, गुलाब क्षीरसागर आदींनी परिश्रम घेतले. या व्याख्यानाचे प्रास्ताविक शेषेराव सरवदे यांनी केले. सूत्रसंचालन तुळशीराम देडे तर आभार ईश्वर क्षीरसागर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शहरातील बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते.
मुरूम, ता. उमरगा येथील अण्णाभाऊ साठे चौकात व्याख्यानाप्रसंगी प्रमुख वक्ते प्रा. लक्ष्मण ढोबळे बोलताना बसवराज पाटील व अन्य.
0 Comments