Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

बालमनाला समृद्ध करण्यासाठी शिक्षणाची भूमिका महत्त्वाची--डॉ. रविराज शिंदे राष्ट्रवादी नेते सुरेश बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त मुरुम येथे शालेय साहित्याचे वाटप

मुरुम/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुरेश बिराजदार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुरूम शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील मुले केंद्रीय प्राथमिक शाळेत शिकत आहेत. या मुलांच्या भविष्याकरिता त्यांच्या शैक्षणिक साहिच्याकरता मायेचा छोटासा आधार देण्याच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी (ता. २०) रोजी शालेय साहित्य देण्यात आले. माजी नगरसेवक प्राचार्य दत्ता इंगळे, मुख्याध्यापक  विजयकुमार कोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तानाजी फुगटे, शहराध्यक्ष विठ्ठल पाटील, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष श्रीधर इंगळे, पत्रकार नहीरपाशा मासूलदार, सुनंदा हूल्ले, अशोक बोईनवाड, राहुल सत्रे, किशोर शिंदे, छाया बनसोडे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

मानसोपचार तज्ञ डॉ. रविराज शिंदे यांनी सांगितले की, शिक्षण हे उज्वल भविष्याचा पाया आहे. तरीही जगभरातील लाखो मुले मूलभूत शिक्षण संसाधनांपासून वंचित आहेत. बाल मनाला घडविण्यात शिक्षणाची महत्त्वाची भूमिका असते. या उपक्रमाचा उद्देश शैक्षणिक अंतर भरून काढणे, वंचित विद्यार्थ्यांना सक्षम करणे आणि शिकण्याच्या प्रवाहात आणणे. यावेळी दत्ता इंगळे, विजयकुमार कोळी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन शैलजा माने तर आभार हुसेन तांबोळी यांनी मानले.                          
मुरूम, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद  शाळेत सुरेश बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करताना मान्यवर व विद्यार्थी.

Post a Comment

0 Comments